Best News Portal Development Company In India

शिक्षणासोबत विविध कौशल्ये आत्मसात केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतो – श्रीकांत भराटे !

शिक्षणासोबत विविध कौशल्ये आत्मसात केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतो – श्रीकांत भराटे
—————–
उमरगा आदिनाथ भालेराव.
शिक्षणासोबत विविध कौशल्ये आत्मसात केल्यास आत्मविश्वास, चिकाटी व योग्य मार्गदर्शनाच्या बळावर आपण कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतो. त्यामुळे करिअर नियोजनाला महत्त्व देत सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पोलिस सहायक निरीक्षक श्रीकांत भराटे यांनी व्यक्त केले.
मायक्रोकॉम कंम्प्युटर एज्युकेशन व रोटरी क्लबच्या वतीने गुरुवारी (ता.पाच) रोजी विवीध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय मेनकुदळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, नगरसेवक विजय दळगडे, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, रोटरीचे सचिव प्रा. राजू जोशी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक विजय दळगडे, प्रा. डॉ. धनंजय मेनकुदळे यांची भाषणे झाली.
प्रा. युसुफ मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
इरफान मुल्ला, पंकज बेलकोणे, श्रीकांत कोळी, सुमैय्या जमादार, रमेजा मोमीन, प्रज्ञा जाधव, रेवती वाडीकर,भुमी गायकवाड, महेक मोमीन यांनी यासाठी पुढाकार घेतला. दिव्या सुर्यवंशी यांनी सुत्रसंचलन केले. मोनीका जाधव यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india