Best News Portal Development Company In India

उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांची उपजिल्हा रुग्णालय अशासकीय समितीच्या सदस्यपदी निवड!

उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांची उपजिल्हा रुग्णालय अशासकीय समितीच्या सदस्यपदी निवड!
तलमोड आनंद सूर्यवंशी :-
उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबुराव जाधव यांची उपजिल्हा रुग्णालयाच्या सनियंत्रण व सल्लागार अशासकीय समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरड यांनी दिनांक ५ मार्च २०२६ रोजी दिलेल्या पत्राद्वारे ही निवड जाहीर करण्यात आली.
रमेश जाधव हे सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या समितीवर त्यांची निवड करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल परिवर्तन सामाजिक संस्था, टायगर्स तायकांदो कराटे अकॅडमी तसेच गोर बंजारा समाज संघटना यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india