तुळजापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन!
तुळजापूर : तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ, कणे गल्ली येथे धार्मिक वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून कीर्तनकार व भागवताचार्य उपस्थित राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सप्ताहाचे प्रेरणा व मार्गदर्शन ह.भ.प. श्री. पांडुरंग महाराज रेड्डी, तुळजापूर यांचे लाभले आहे. तर कथा प्रवक्ते म्हणून ह.भ.प. श्री. तुकाराम महाराज शास्त्री (शुक्लेश्वर संस्थान, निमगाव) हे श्रीमद भागवत कथा सांगणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन श्री. प्रशांत अपराध, तुळजापूर यांनी केले आहे.
दैनिक कार्यक्रम
दररोज सकाळी व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
पहाटे ४ ते ५ काकड आरती
सकाळी ८ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण
दुपारी २ ते ५ श्रीमद भागवत कथा
सायं. ५.३० ते ६.३० हरिपाठ
रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन
प्रमुख कीर्तन व प्रवचन कार्यक्रम
मंगळवार दि. 17/03/2026 – ह.भ.प. श्री. पांडुरंग महाराज रेड्डी, तुळजापूर
बुधवार दि. 18/03/2026 – ह.भ.प. कु. आशीर्वादताई महाराज राजस्त, भांत्रे
गुरुवार दि. 19/03/2026 – ह.भ.प. श्री. गणेश महाराज शिरसागर, कामठा
शुक्रवार दि. 20/03/2026 – ह.भ.प. श्री. योगेश (बप्पा) महाराज इंगळे
शनिवार दि. 21/03/2026 – ह.भ.प. कु. बालकीर्तनकार ज्ञानेश्वरी एकनाथ पोटे
रविवार दि. 22/03/2026 – ह.भ.प. श्री. विजय महाराज शास्त्री, लातूर
सोमवार दि. 23/03/2026 – ह.भ.प. श्री. ऋद्धव महाराज शास्त्री, उजणी
मंगळवार दि. 24/03/2026 – ह.भ.प. श्री. तुकाराम महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन व श्री राजाभाऊ चौधरी यांच्या हस्ते काल्याचा महाप्रसाद
कार्यक्रमाचे व्यवस्थापन अधिकारी ह.भ.प. सौ. उज्वला (मामी) अजित शिरसागर या पाहत आहेत.
संपूर्ण सप्ताहाचा कार्यक्रम कणे गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर जि. धाराशिव येथे पार पडणार असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






