सुनिता पावशेरे यांनी पाणी पुरवठा योजने संदर्भात घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि.१४ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा कलदेव निंबाळाच्या माजी सरपंच विद्यमान उपसरपंच सौ.सुनिता देविदास पावशेरे यांनी कलदेव निंबाळा गावांसह उमरगा लोहारा तालुक्यातील १६ गांवच्या पूर्ण होवूनही रखडलेली कायमस्वरूपी जलजीवन पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करणे संदर्भात बारामती येथे भेटून निवेदन दिले
या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सविस्तर माहिती घेतली चर्चा करुन आश्वासन दिले.
ग्रामसभा ठरावासह , मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, जीवन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे या संदर्भात आतापर्यंत केलेल्या पाठपुरासह निवेदन दिले.
ही योजना पूर्ण होऊनही मागील योजनेचे महावितरणचे ७६ लक्ष रक्कम देणे असल्याने योजना ही योजना लाल फितीत रखडून अडकल्याने कार्यान्वित होत नाही. कलदेव निंबाळा गावांसह दोन्ही तालुक्यातील१६ गावच्या महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक या योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत शिवाय आता उन्हाळा कडक होत असल्याने पाण्याची तीव्र टंचाई या गावांमध्ये भासत आहे. यामुळे सुनिता पावशेरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना या गावांच्या वतीने दि. १३ रोजी निवेदन दिले.
*”महत्वपूर्ण मोठी योजना पूर्ण होवूनही सुरू होत नसल्याने भेट घेतली. ही योजना लवकरात लवकर मार्गी लावू असे उपमुख्यमंत्री यांनी भेटीत आश्वासन दिले आहे.” – सौ.सुनिता देविदास पावशेरे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी.






