समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली भुयार शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा.
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
दिनांक 13 मार्च 2026 रोजी तालुक्यातील समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल चिचोली भुयार येथील शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून प्रा. किरण सगर माजी सरचिटणीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. बिराजदार के. पी. म सा प सदस्य , कमलाकर भोसले सर म सा प सदस्य ,रंजित गायकवाड माजी सरपंच , प्रमोद गायकवाड उपसरपंच, राहुल थोरात ग्रा प सदस्य,पोलीस पाटील विठ्ठल पवार नाईकनगर, संदीप जगताप जकेकूरवाडी उपसरपंच, जाकीया तांबोळी, शोभा माने संस्था उपाध्यक्ष सत्यभामा गायकवाड, संस्था सचिव विकास गायकवाड मुख्याध्यापिका प्रियंका गायकवाड उप मुख्याध्यापक रावसाहेब बनसोडे,संतोष कलशेट्टी प्रकर्षदीप प्रयाग
आदि मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करून सुरवात करण्यात आले
प्रथमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घघाटक आणि प्रमुख पाहुणे मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर,रसिक बांधवाचे स्वागत गीताने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे उप मुख्याध्यापक रावसाहेब बनसोडे यांनी केले.त्या नंतर मा.कमलाकर भोसले सरांनी आपल्या मनोगतात संस्था काढणं सोपं असतं पण ते टिकवन फार तारेवरची कसरत असते असे मत व्यक्त केले,त्यानंतर के.पी.बिराजदार यांनी हि संस्था ग्रामीन,मुलांसाठी,त्यांच्या भवितव्यासाठी सर्वांना उपलब्ध हि अनमोलाची बाब आहे तसेच प्रा.किरण सगर यांनी ,जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल, व्यवहार करायचा असेल तर इंग्रजी शालेय शिक्षण महत्वाचे आहे .जागतीक संवाद हा इंग्रजीतुनच साधला जातो तसेच मायबोली मराठी बाबतही तिचे महत्व व्यक्त केले असे मान्यवरानी मनोगत व्यक्त केल.त्यानंतर विविध स्पर्धा व शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत , समाज प्रबोधन , लोक कला गाण्यावर इयत्ता नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य वेशभुषासह उत्कृष्ट सादरिकारण केले.
कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील चिंचोली भुयार काटेवाडी, नाईक नगर,शिवाजीनगर, येथील शिक्षणप्रेमी जेष्ठ नागरिक,पालक,माता-भगणी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी,सर्व कर्मचारी वृंद, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली भुयार .शाळेचे उपमुख्याध्यापक रावसाहेब बनसोडे,राणू जाधव मॅडम, स्वाती राठोड मॅडम, सोनू चव्हाण मॅडम, सोमशंकर स्वामी, यशोदा लोहार, विशाल सोमवंशी, प्रभात गायकवाड, विश्वदीप गायकवाड,हरीश कांबळे, लक्ष्मण कोळी आणि गावातील शिक्षणप्रेमी समाज बांधवांनी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पवन माने, समृद्धी गायकवाड,आकांक्षा गायकवाड यांनी केले
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका गायकवाड यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे,शिक्षणप्रेमी,
रसीक प्रेषकांचे आभार मानले.








