Best News Portal Development Company In India

जळकोट भिमनगर येथील पाईप लाईन व गटार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा इफेक्ट!

जळकोट भिमनगर येथील पाईप लाईन व गटार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा इफेक्ट
————————————————–
जळकोट (अरुण लोखंडे):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट भिम नगर येथील तुंबलेल्या गटारी आणि फुटलेली पाईपलाईन सह विविध समस्या विषयी संबंधित पंचायत समिती तुळजापूर चे गटविकास अधिकारी यांना एक लेखी निवेदन देऊन टाळा ठोको आंदोलनाचा इशार दिला होता. त्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतीने
येथिल तुंबलेल्या गटारीची व फुटलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे.
. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन-चार महिन्यापासून भीम नगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन येथील मुकुद लोखंडे यांच्या घरासमोर फुटून शेकडो लिटर पाणी वाया जाऊन भीमनगर येथील अंतर्गत गटारी तुबून गटारीची दुर्गंधी भीम नगर मध्ये पसरली होती.या संदर्भात अनेक वेळा संबंधित ग्रामपंचायतीला लेखी व तोंडी विनंती करून हे या कामाकडे संबंधित ग्रामपंचायतीने दुर्लक्षच केले होते. तसेच भिम नगर येथे सहा महिन्या पूर्वी शासकीय योजनेतून मंजूर झालेले अंतरगत सिमेंट रस्त्या चे काम प्रलंबित आहे. गेला दोन तीन महीने झाले काम बंद आहे संमधीत गुत्तेदार जाणिपूर्वक हे काम बंद ठेवले असून संपूर्ण काम झाल्या शिवाय या कामाचे बिल काढू नये. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. तेंव्हा नाईलाजास्तव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना एक लेखी निवेदन देऊन या देवून दि. १४ एप्रिल २o२६ पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अगोदर हे काम पूर्ण नाही झाले तर ग्रामपंचायतीला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ग्रामस्थासह टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता या दिलेल्या लेखी निवेदनाचा परिणाम म्हणून जळकोट येथील भीम नगर मध्ये सध्या तुंबलेल्या गटारीची व फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून बाकी कामेही लवकरच पुर्ण करतिल असी अपेक्षा आहे.
‌एकंदरीत भिम नगर येथे सुरु केलेल्या कामा बद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी ग्रामपंचायतचे कर्मचारी लहू कारले मल्लिनाथ डांगे विलास फुकटे लिंबू सगर अर्जन कदम आदी उपस्थितीत होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india