उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल परिसरातील अंगणवाडीस दिल्ली येथील रॉकेट लर्निंग टीमची भेट.
तुरोरी दमयंती भालेराव.
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वडार वाडा अंगणवाडी दिल्ली येथील रॉकेट लर्निंग टीमने भेट दिली यावेळी या टीम मध्ये फाउंडर सिद्धांत सचदेव अर्चना भास्कर, राम नगरे प्रोग्राम मॅनेजर गोपी व्हनमाने जिल्हा समन्वयक सोनाली यादव अंगणवाडी शिक्षिका ज्योती मुळे अंगणवाडी मदतनीस संगीता सोनकांबळे उपस्थित होत्या. रॉकेट लर्निंग संस्था महाराष्ट्र तसेच शाळा पूर्व शिक्षण एका नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने पालकांचा बालकाच्या शिक्षणात सहभाग वाढवण्यासाठी या टीमने भेट दिली आजच्या भेटीत उमरगा येथील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बालकांसोबत व अंगणवाडी शिक्षिका सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली ज्योती मुळे यांचे अंगणवाडीतील शैक्षणिक कार्य उत्कृष्ट असल्याचे मत राॕकेट लर्निंग टीमने नोंदवले विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्याला आनंददायी शिक्षणा ची सोय या अंगणवाडीत करण्यात आलेली आहे यावेळी रॉकेट लर्निंग टीमच्या सर्व सदस्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा च्या वतीने मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते व सांस्कृतिक विभाग प्रमुख भाग्यश्री पंडित नागेश स्वामी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.






