दिव्यांग सारथी ला प्रथम तर माझी शाळा माझी डिजिटल बँक ला द्वितीय पारितोषिक.
तुरोरी दमयंती भालेराव.
अटल जिल्हास्तरीय प्रकल्प प्रदर्शनात उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलचे वर्चस्व.
उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी अटल टिंकरिंग जिल्हास्तरीय प्रकल्प प्रदर्शनात दोन पारितोषिके मिळवून वर्चस्व निर्माण केलेले आहे डायटचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे यांच्या हस्ते हे पारितोषक यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना प्रदान करण्यात आले. यावेळी डाएट च्या वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती गंगा मेनकुदळे गणित व विज्ञान विभाग प्रमुख अधिव्याख्याता प्रदीप घुले अटल टिंकरिंग जिल्हा समन्वयक श्रीमती प्रिया मेश्राम उपस्थित होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि लेंड हॅन्ड इंडिया पुणे यांच्या वतीने जिल्ह्यातील अटल टिंकरिंग लॅब असलेल्या चोवीस शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रकल्प प्रदर्शन जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल डिजिटल लिटरसी थीम वर आधारित प्रकल्प या चार विषयावर तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक प्रकल्प प्रदर्शनात उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल येथील तंत्रस्नेही शिक्षक संजय रुपाजी भाग्यश्री पंडित व नागेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी केदारे व श्रद्धा जाधव यांनी थीम बेस्ड प्रोजेक्ट मध्ये सादर केलेल्या दिव्यांग सारथी या प्रकल्पाला जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक तर डिजिटल लिटरसी विभागांतर्गत माझी शाळा माझे डिजिटल बँक या प्रकल्पाला जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
या प्रदर्शनात परीक्षक म्हणून प्रा. कुलकर्णी, प्रा. चौधरी श्रीमती प्रा मुगळे व प्रा.शिंदे यांनी काम पाहिले यावेळी डाएटचे अधिव्याख्याता उमेश नरवडे, मिलिंद अघोर दिलीप जमादार शरीफ शेख उपस्थित होते.मुख्य प्रशिक्षक म्हणून रामदास लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी शिक्षक व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती कार्याध्यक्षा शकुंतला मोरे सुजाता मोरे गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत मुख्याध्यापक पद्माकर मोरे, केंद्रप्रमुख शिला मुदगडे, शिक्षण तज्ञ सदानंद शिवदे पाटील, अशोक पतगे, अमर वरवटे व शाळेतील सर्व शिक्षक पालक व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले.






