Best News Portal Development Company In India

जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभापती पदी सिद्धेश्वर आण्णा कोरे यांची निवड करावी : नंदगाव जि.प.गटातील जनतेची मागणी!

जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभापती पदी सिद्धेश्वर आण्णा कोरे यांची निवड करावी : नंदगाव जि.प.गटातील जनतेची मागणी
——————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
नुकतच पार पडलेल्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नंदगाव जि.प. गटातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार व तुळजापूर तालुक्याचे कार्यसम्राट,विकासरत्न, लोकनेते,आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत विश्वासू कार्यकर्ते सिद्धेश्वर आण्णा बाजीराव कोरे हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले असून त्यांची जि.प च्या कृषी सभापती पदी निवड करावी असी मागणी नंदगाव गटातून व परिसरातील जनतेतून होत आहे.
नंदगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर अण्णा कोरे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ग्राम पंचायतीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ते येथील जनतेची सेवा करतात. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीची त्यांना जाणीव आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसी त्यांचा चांगला संपर्क आहे.त्यांनी माझी तुळजापूर पंचायत समिती सदस्य म्हणून ही तालुक्यातील जनतेची सेवा केलेली आहे.
सर्वसामान्य माणसाच्या समस्यांची त्याना जाणिव असून त्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात.जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असो किंवा गोरगरिबांसाठी,मागासवर्गीया साठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या शासनाच्या योजना असो किंवा शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. आमदार राणा दादा यांच्या नेतृत्वावर त्यांचा दांडगा विश्वास आहे.आदरणीय आमदार राणा दादा आणि नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष भावनेने निस्वार्थीपणे जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे. त्यांच्या या कामामुळेच
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जि.प.गटातील कार्यकर्ते पदाधिकारी जेष्ठ नागरिक शेतकरी वर्ग आदी मतदारानी फार मोठ्याअपेक्षण त्यांना निवडून दिलेला आहे.
जर त्यांना जिल्हा परिषद कृषी विभाग सभापती म्हणून संधी दिली तर अधिकाराने चांगल्या प्रकारे शेतकरी, शेतमजूरासह सर्वसामान्य जनतेची कामे करता येतील आणि त्याचा फायदा भविष्यात त्यांच्या राजकीय चळवळीला होईल. खर तर आदरणीय आमदार राणा दादा आणि अर्चना ताई पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवनिर्वाचित जि.प.सदस्य म्हणून नंदगाव गटातून सिद्धु अण्णा कोरे याना जनतेनी निवडून दिलेलआहे.तेंव्हा निस्वार्थी निष्ठावंत कार्यकर्ता आदरणीय सिद्धेश्वर अण्णा कोरे याना जि.प. चे कृषी सभापती पदी निवड करून काम करण्याची संधी द्यावी असी मतदार संघातून जोरदार मागणी होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india