उद्या २२ मार्चला ‘रेफरल दर्शन’ बंद; चैत्र नवरात्र आणि रविवारमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय !
तुळजापूर प्रतिनिधी -:
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये उद्या, रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. उद्या ‘चैत्र नवरात्र’ आणि ‘रविवार’ची सुट्टी एकाच दिवशी आल्याने भाविकांचा ओघ प्रचंड वाढणार आहे.
गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि सर्व भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी ‘रेफरल दर्शन पास’ (शिफारस पत्र दर्शन) पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दर्शनासाठी खालील सुविधा सुरू राहतील:
गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने सशुल्क दर्शन सुविधा सुरू ठेवल्या आहेत:
सशुल्क दर्शन पास: रु. २००/-
स्पेशल देणगी दर्शन पास: रु. ५००/-
तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) , श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी सर्व भाविकांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भाविकांना दर्शनासाठी येताना कोणतीही गैरसोय होणार नाही.आणि भाविकांना जलद गतीने दर्शन होईल.






