Best News Portal Development Company In India

नळदुर्ग पोलीसांनी 10,38,20,000 ₹ किंमतीचे हशीम ऑईल केले जप्त.”

नळदुर्ग पोलीसांनी 10,38,20,000 ₹ किंमतीचे हशीम ऑईल केले जप्त.”
———————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते तुळजापूर जाणाऱ्या रोडवर उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग जवळ नळदुर्ग पोलीस रोडवर नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन करत असताना एक कार चालक कार न थांबवता कारमधिल हशीम आईल सदृश आमली पदार्थाची बॅग फेकून भरधाव वेगाने निघून गेल्याची घटना घङली असून नळदुर्ग पोलीस ठाणे येथे आमली पदार्थ बाळगणार्‍या दोन अनोळखी इसमावर गुन्हा नोद केला आहे.
. या बाबत नळदुर्ग पोलीस सुत्रा कडून मिळालेली माहिती असी की दि.19.03.2026 रोजी सहा पोलीस निरीक्षक- श्री. सोळुंके, पोलीस उप निरीक्षक श्री. गिते हे पोलीस स्टाफ सह उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग ते तुळजापूर कडे जाणारे रोडवर नाकांबदी व कोबिंग ऑपरेशन करत असताना पोलीस पथकास एक संशयास्पद कार क्र एमएच 12 जीव्ही 1517 दिसून आल्याने त्यास थांबण्याचा ईशारा केला असता ती पळून जात असताना पोलीस पथकाने सदर गाडीचा पाठलाग करत होते. दरम्यान गाडीतील एका इसमानी रोडचे कडेला एक बॅग फेकुन दिल्याने पथकाने सदर बॅगची पाहणी केली असता बॅगमध्ये दहा प्लॅस्‌टीकच्या पिशव्यामध्ये हिरवट काळपट अवस्थेतील हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ वजन 10.382 कि. ग्रॅ एकुण 10,38,20,000₹ किंमतीचा हशीम ऑईल अमंली पदार्थ माल मिळून आल्याने सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन अनोळखी इसमावर(क्र एमएच 12 जीव्ही 1517) यांचेविरुध्द गुंगीकारक औषधीद्रव आणि मनोव्यावारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8(सी),20(B)(ii)(C), 25, 29 अन्वये गुरंन 114/2026 असा गुन्हा नळदुर्ग पो.ठा. येथे 20.03.2026 रोजी नोंदवला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी- श्री. परि.सहा.सपोअ मेघना आय एन, सपोनि श्री. सोळुंके, आनंद कांगुने, पोउपनि- श्री. गिते, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india