Best News Portal Development Company In India

तुळजापुरात १० हजारांची ताडी जप्त; कानेगावच्या एकावर गुन्हा दाखल ! ​तुळजापूर (प्रतिनिधी):

तुळजापुरात १० हजारांची ताडी जप्त; कानेगावच्या एकावर गुन्हा दाखल !
​तुळजापूर (प्रतिनिधी):
तुळजापूर शहर पोलिसांनी अवैध मद्यविक्री विरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील नवीन बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे ताडी विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका ५२ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . पुढील कारवाई चालू आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील नवीन बसस्थानकासमोर एक व्यक्ती संशयास्पद रित्या थांबली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, रमेश सिध्दाप्पा वैरागकर (वय ५२ वर्षे, रा. कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव) याच्याकडे १०० लिटर ‘सिंधी ताडी’ हे अमली द्रव आढळून आले.
अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली ही १० हजार रुपये किमतीची ताडी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपी रमेश वैरागकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम ६५ (ई) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी आपला मोर्चा वळवला असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असे संकेत पोलीस प्रशासनाकडून मिळत आहेत.या घटनेवरून असे निदर्शनास येते . अवैध धंद्याविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आलेल आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india