रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)तुळजापूर आणि ‘तुळजाई एक्सप्रेस’ न्यूज पोर्टल यांच्यावतीने नवनियुक्त पंचायत समिती सभापती श्री.विक्रम देशमुख साहेबांचा जंगी सत्कार!
तुळजापूर (तुळजाई एक्सप्रेस वृत्तसेवा):
स्थानिक राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे श्री. विक्रम देशमुख साहेब यांची तुळजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ठिकठिकाणी सन्मान होत आहे. याच पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तुळजापूर आणि तुळजाई एक्सप्रेस न्यूज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष आयु. बाबासाहेब मस्के , माजी पंचायत समिती सदस्य विष्णू घोडके ,तसेच तुळजाई एक्सप्रेसचे संपादक व (आरपीआय) ( OBC) सेल चे तुळजापूर शहराध्यक्ष श्री लहू घोडके व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुष्पहार घालून पेढा भरूवुन तुळजापूर पंचायत समिती सभापती श्री विक्रम देशमुख साहेबांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. देशमुख साहेब यांनी सर्वांचे आभार मानले. “हे पद म्हणजे जनतेने दिलेली मोठी जबाबदारी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य ध्येय राहील,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
तुळजाई एक्सप्रेसचा सामाजिक पुढाकार
या सत्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनीच नवनियुक्त सभापतींना त्यांच्या पुढील वाटचालीस क्रांतिकारी शुभेच्छा दिल्या.






