Best News Portal Development Company In India

केंद्रीय शिक्षक शिक्षिका सीईटी परीक्षा तुळजापूर येथे संपन्न ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

केंद्रीय शिक्षक शिक्षिका सीईटी परीक्षा तुळजापूर येथे संपन्न

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

दि.२३ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक शिक्षिका तसेच बौद्धाचार्य परीक्षा दिनांक २२ मार्च २०२६ रोजी आनंद बुद्ध विहार हडको तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे संपन्न झाली.

केंद्रीय शिक्षक शिक्षिका सीईटी परीक्षेच्या परीक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या महिला आघाडीचे अध्यक्ष स्वातीताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सीईटी परीक्षा आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली.
सीईटी परीक्षा सुरू होण्याअगोदर तथागत भगवान गौतम बुद्ध.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाचे मूर्तीचे पूजन महाराष्ट्राच्या महिला आघाडीचे अध्यक्ष स्वातीताई शिंदे यांच्या हस्ते दीप धूप आणि पुष्प अर्पण करून करण्यात आले व सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी धाराशिव दक्षिणच्यावतीने परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या अध्यक्ष स्वातीताई शिंदे यांचा धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
केंद्रीय शिक्षिका स्वातीताई शिंदे यांनी सर्वप्रथम परीक्षेचे सर्व नियम व बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला केंद्रीय शिक्षक शिक्षिका व बुद्धाचार्य तसेच संस्था याविषयी मार्गदर्शन केले व आनंदी वातावरणामध्ये आपण सीईटी परीक्षेला सामोरे जावे यासाठी शुभेच्छा दिल्या व परीक्षेला सुरुवात करण्यात आली.

केंद्रीय शिक्षक आणि शिक्षिका यांच्या सीईटी परीक्षा झाल्यानंतर बौद्धाचार्य परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम, सरचिटणीस विजय भाऊ बनसोडे, कोषाध्यक्ष मीनाताई लगाडे, केंद्रीय शिक्षिका शीलाताई चंदनशिवे, जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड, जिल्हा संघटिका विद्याताई कांबळे, जिल्हा संघटिका केराताई गायकवाड सचिव रत्नदीप मस्के , उमरगा तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे तसेच उमरगा लोहारा तुळजापूर धाराशिव येथील सर्व संस्थेचे पदाधिकारी तसेच परीक्षार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india