Best News Portal Development Company In India

व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सलग ३ वर्ष लैंगिक अत्याचार २४ वर्षीय महिलेची लोहारा पोलिसात तक्रार दाखल !

व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सलग ३ वर्ष लैंगिक अत्याचार २४ वर्षीय महिलेची लोहारा पोलिसात तक्रार दाखल !
तुळजापूर प्रतिनिधी :- 2023 ते 2026 सलग तिन वर्षे महिलेला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक आत्याचार पिडीतमहिला आपलं ऐकत नाही असे लक्षात आल्यानंतर आरोपीने त्याच्या जवळील व्हिडिओ आणि फोटो पीडितेच्या मोबाईलवर टाकून तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणून पीडीत महिलेने लोहारा पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
विस्तारित घटनाक्रम- पीडित महिलेचे नाव गोपनीय सदरील महिलेची ओळख वाढवून 2023 मध्ये महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले . आणि त्याचे चित्रीकरण केले व ते चित्रीकरण वायरल करण्याची भीती दावत सलग तीन वर्ष महिलेवर अत्याचार केला. तुझ्या खात्यावर दहा लाख रुपये टाकतो असे आमिष दाखवण्यात आले. असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 64(1), 352, 352, 356(2) सह कलम 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पुढील तपास लोहारा पोलीस स्टेशन करत आहे परंतु दिवसेंदिवस महिलांच्या तक्रारीत वाढ होत असून पीडित महिलेच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीस शिक्षा व्हावी पीडित महिलेला न्याय मिळावा अशी जनमानसातून मागणी होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india