Best News Portal Development Company In India

रावगांव येथील जि. प. प्राथमिक शाळा धनगरवस्ती येथे वेन्नू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव व श्री. तिरुपती बालाजी संस्थान मंदिर यांच्यातर्फे साहित्य वाटप!अविनाश जोशी/ करमाळा .

अविनाश जोशी/ करमाळा
रावगांव येथील जि. प. प्राथमिक शाळा धनगरवस्ती येथे वेन्नू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव व श्री. तिरुपती बालाजी संस्थान मंदिर रावगांव संस्थापक अध्यक्ष श्री. लक्ष्मण नेमचंद बुधवंत यांच्यामार्फत 30विद्यार्थी यांना स्टील चे जेवण डब्बे त्यांच्या मातोश्री श्रीम. पदमिन नेमचंद बुधवंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गेले दहा वर्षापासून श्री. लक्ष्मण बुधवंत हे सामाजिक कार्यात भाग घेत असून रावगांव व परिसरातील शाळांतील विदयार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करत आलेले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ. संध्या कांबळे, सरपंच श्री. संदीप शेळके, उपसरपंच श्री. भाऊसाहेब करगळ मार्केट कमिटी संचालक श्री. दादासाहेब जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. तात्यासाहेब पाटुळे, उपाध्यक्ष श्री. असिफ शेख, ग्रामपंचायत सदस्य श्री. दादासाहेब पवार, ज्ञानेश्वर जाधव, करमाळा तालुका समता परिषद अध्यक्ष श्री. प्रशांत शिंदे सामाजिक कार्यकर्ते श्री. अण्णासाहेब भोसले श्री. राजेश बरडे उपस्थित होते. शाळेच्यावतीने सर्व मान्यवर यांचे स्वागत श्रीम. रोहिणी चव्हाण यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री. अशोक बरडे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india