गुलबर्ग्यातील देवींचे भक्त श्रीकांत लाहोटी यांची श्री तुळजाभवानी देवीस १ लाख ९२ हजार रुपयांची देणगी; मंदिर संस्थानतर्फे सत्कार !
तुळजापूर प्रतिनिधी;-
कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवासी आणि श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त श्रीकांत लाहोटी यांनी आज देवीच्या चरणी १ लाख ९२ हजार ८७२ रुपयांची देणगी अर्पण केली. आपल्या अखंड श्रद्धा व भक्तिभावातून त्यांनी ही देणगी अर्पण करत श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेतले.
श्रीकांत लाहोटी हे गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला देणगी देत असून, ते दरवर्षी कधी वस्तू स्वरूपात तर कधी रोख रकमेच्या स्वरूपात देणगी देऊन श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी आपली सेवा बजावत असतात. साऱ्या विश्वाची आई जगत जननी श्री तुळजाभवानी माता आणि भाविक भक्त हे अतूट नाते आहे. काही जण नवसापोटी तर काहीजण श्रद्धेने देवीच्या चरणी राजरोसपणे रक्कम अथवा वस्तू दान करून देवीची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करत असतात देवीच्या चरणी दान करणे ही परंपरा अनाधिकाला पासून चालत आलेली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सुद्धा या आलेल्या रकमेतून अबाल वृद्ध, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, व गोरगरीब भाविक भक्त यांना अत्यंत चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून सेवा करत असते.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जयसिंग पाटील यांनी श्रीकांत लाहोटी यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी महेंद्र आदमाने, तेजस कऱ्हाळे, विश्वास कदम तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.






