महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा ‘प्रकट दिन’ उत्साहात साजरा; नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते महापूजा व महाप्रसाद वाटप!
तुळजापूर प्रतिनिधी;-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा उत्पत्ती दिन म्हणजेच ‘प्रकट दिन’ आज तुळजापूर नगरीत मोठ्या उत्साहात, चैतन्यमयी आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलमयी दिनानिमित्त देवीची विशेष पूजा, अभिषेक आणि जन कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मातेस विधीवत अभिषेक पूजा आणि महाआरती करण्यात आली. हे धार्मिक विधी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष विनोद (पिटूभैया) गंगणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी श्री देवीजींच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण जन कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
अभिषेक सोहळ्यानंतर मंदिर परिसरातील महाद्वारासमोर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी भाविकांनी ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.
या सोहळ्याला श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा, नगराध्यक्ष विनोद (पिटूभैया) गंगणे, तहसीलदार तथा व्यवस्थापक माने मॅडम, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांची प्रमुख उपस्थिती .
तसेच नागेश नाईक, किशोर गंगणे, पत्रकार गोविंद खुरुद, नागेश शितोळे यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी बोधले, इंद्रजीत साळुंके, बाळासाहेब भोसले, सागर इंगळे, दिगंबर खुंटाफळे, किरण कदम, नितिन जट्टे, बाळू साठे, विशाल शेटे, बापूसाहेब करडे, श्रीकृष्ण साळुंके, प्रसाद पानपुडे, शुभम क्षीरसागर, ओंकार टोले यांसह मोठ्या संख्येने पुजारी बांधव, व्यापारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.
दिवसभर मंदिरामध्ये भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली असून, संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली होती. तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो अशी प्रार्थना करण्यात आले.







