चक्रवती सम्राट राजा अशोक यांची २३३० वी जयंती उत्साहात साजर
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उमरगा यांच्या वतीने चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांची २३३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरामध्ये चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उमरगा च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
चक्रवती सम्राट राजा अशोक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नंतर संपूर्ण जगामध्ये धम्म पोहोचवण्यासाठी धम्माचा स्वीकार केला व त्याप्रमाणे संपूर्ण जगामध्ये धम्माच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी आपला आयुष्य त्यागलं त्याचबरोबर त्यांचे मुलं महेंद्र आणि संघमित्रा यांनी सुद्धा धम्मदीक्षा घेऊन तथागतांचा विचार जगामध्ये पसरवण्याचा काम केले आणि त्यामुळे १९५६ पर्यंत हा धम्म टिकून राहिला आणि त्यानंतर १९५६ ला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म पुन्हा एकदा पुनर्जीवित केला आणि तिला सर्व नागरिकांसाठी हा धम्म सागर खुला करून सर्वांना त्रिशरण पंचशील बुद्धाय धम्म हा ग्रंथ देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राट राजा अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जपण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा अविरतपणे काम करत असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे यांनी जयंतीनिमित्त बोलत असताना मत व्यक्त केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, तालुका सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष पर्यटन विभाग तातेराव मादळे,माजी तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे, बुद्ध शासन ग्रुपचे अध्यक्ष कोशिंबीर सोनकांबळे, धीरज कांबळे,सिद्धार्थ सोनकांबळे, मिलिंद कांबळे, तसेच सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.






