Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात, भवानी रोडवरील किसन लॉजसमोर पडलेली एक पर्स संबंधित भाविकांची योग्य ओळख पटवून प्रामाणिकपणे परत करण्यात आली.

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात, भवानी रोडवरील किसन लॉजसमोर पडलेली एक पर्स संबंधित भाविकांची योग्य ओळख पटवून प्रामाणिकपणे परत करण्यात आली.

तुळजापूर प्रतिनिधी ;- श्री तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आणि कृपेने काबाडकष्ट करून जगणारे आणि आपली सेवा उत्तम प्रकारे बजावणारे कर्मचारी ही आपली नोकरी नसून श्री जगदंबे चरणी आपली सेवा आहे या भावनेने काम करणारे स्त्री पुरुष कर्मचारी आपल्या तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये आहेत आणि ते अहोरात्र सेवा बजावत आहेत याचेच एक उत्तम उदाहरण आज तुळजाभवानी मंदिरात परिसरात पाहावयास मिळाले . ही उल्लेखनीय प्रामाणिकता दाखवणाऱ्या स्वच्छता कर्मचारी शोभा संभाजी शिरसट (BVG) यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. याचे अनुकरण सर्वच कर्मचाऱ्यांनी करावे हीच खरी सेवा ठरेल.

मंदिर परिसरात स्वच्छता सेवा देताना त्यांना ही पर्स आढळली. सदर पर्समध्ये एकूण ५,६३८ रुपये रोख रक्कम तसेच एक मोत्याची माळ होती. त्यानंतर कोणताही विलंब न करता, संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून आणि योग्य पडताळणी करून ती पर्स भाविकांना सुपूर्द करण्यात आली.

शोभा संभाजी शिरसट यांच्या या प्रामाणिक व जबाबदार कृतीबद्दल मंदिर संस्थान तसेच भाविकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

अशा कर्मचाऱ्यांमुळे मंदिर प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असून, समाजात प्रामाणिकतेचा आदर्श निर्माण होत आहे.यावेळी सहायक स्वच्छता निरीक्षक अक्षय साळुंखे व BVG स्वच्छता सुपरवायझर अण्णा पलंगे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india