बहुजन हिताय वस्तीग्रहात राजा सम्राट अशोक व क्रातिनायक कांशीरामजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
उमरगा/ लोहारा आदिनाथ भालेराव.
दि.२७ रोजी शहरातील गुंजोटी रोड येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह उमरगा येथे सम्राट अशोक जयंती आणि बहुजन क्रांतिनायक मान्यवर कांशीराम साहेब यांची संयुक्त जयंतीचे औचित्य साधून राजा सम्राट अशोक,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, बहुजन नायक कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या थोर महामानवास अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्ममित्र वगरसेन कांबळे होते तर प्रमुख पाहुणे ध .विबोध हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र उत्तम गायकवाड यांनी केले तर आभार अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी केले.
उत्तम गायकवाड, व ध. विबोध यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनचरित्र्यावर तर मा. वगरसेन कांबळे यांनी मा कांशीराम यांच्या जीवनचरित्र्यावर विद्यार्थी व उपस्थिताना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शान गायकवाड ई १० वी, संघर्ष गायकवाड १०वी, सागर सास्तुरे, विष्णू गाडेकर ई ७वी. संघपाल लोंढे ई ८ वी, यांनी अथक परिश्रमघेतले.







