श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाकडून
तुळजापूर, सर्व भाविक भक्तांना व पुजारी महंत सेवेकरी यांना जाहीर आवाहन!
तुळजापूर प्रतिनिधी:- श्रीक्षेत्र तुळजापूर मंदिर प्रशासनाकडून असे कळवण्यात येते की, श्री तुळजाभवानी मातेचा चैत्र पौर्णिमा उत्सव ( 2026 )दिनांक 30/ 03 /2026 ते 03/04/ 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. या चैत्री पौर्णिमा महोत्सव कालावधीत शाळांना सुट्ट्या तसेच येणाऱ्या सलग सुट्ट्यांचा विचार करता आणि भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता. आई जगदंबेच्या भाविक भक्तांना सुलभदर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून 31/03/2026 रोजीच्या रात्री 1.00 वाजल्यापासून ते दि.05/04/2026 रात्रीपर्यंत भाविक- भक्तांना बिडकर पायऱ्या येथून सोडण्यात येणार आहे. याची सर्व भाविक- भक्तांनी, पुजारी ,सेवेकरी यांनी नोंद घ्यावी. व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे.
तसेच यात्रा काळात गर्दीचे योग्य नियोजन होण्यासाठी दिनांक (31/03/2026) ते (02/04/2026) यादरम्यान स्पेशल देणगी दर्शन पास रुपये (500/) पूर्णतः बंद राहील. तसेच
सह शुल्क देणगी दर्शन पास रुपये (२००/), अभिषेक पासधारक, धर्मदर्शन व मुखदर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांना दर्शनासाठी बिडकर पायऱ्या मार्गे सोडण्यात येईल. यात्रा काळात सावध व सजग राहून भाविक – भक्तांनी आनंददायी दर्शनाचा लाभ घ्यावा.







