Best News Portal Development Company In India

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा प्रयत्न उधळला; महिला रंगेहात पकडली ! तुळजापूर प्रतिनिधी : –

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा प्रयत्न उधळला; महिला रंगेहात पकडली !
तुळजापूर प्रतिनिधी : –
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सतर्क सुरक्षा यंत्रणेच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रयत्न आज उधळण्यात आला. निंबाळकर दरवाजा ते राजे शहाजी महाद्वार परिसरातील पाटीलवाडा येथे घडलेल्या या घटनेत एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले आहे.

पुण्यातील लोणी काळभोर येथील सुरेखा वाडकर या महिला भाविकांची पर्स व दागिने चोरी करण्याचा प्रयत्न सरोज पवार या महिलेकडून करण्यात येत होता. यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक प्रतीक धनके आणि लहू बोंदर यांनी संशयास्पद हालचाली लक्षात घेत तत्काळ कारवाई करत संबंधित महिलेला रंगेहात पकडले.

यानंतर पकडलेल्या महिलेला मंदिर पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर यांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला तुळजापूर पोलिस स्टेशन येथे पाठविण्यात आले.

या कारवाईदरम्यान सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, प्रतीक दिवाणजी, सुरक्षा पर्यवेक्षक बिभीषण माने, योगेश फडके तसेच मंदिर संस्थानचे इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
पुढील तपास तुळजापूर पोलीस स्टेशन करतीलच तरी सदरील घटना लक्षात घेता यात्रा काळात तुळजापुरातील नागरिकांनी तसेच यात्रेकरू तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण गर्दीचा फायदा घेत असे भुरट्या चोऱ्या करणारे चोरट्यांचे
प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india