Best News Portal Development Company In India

नळदुर्ग बायपासवर थरार! पोलिसांना धमकावून शासकीय कामात अडथळा; बीडच्या तिघांसह स्थानिक आरोपीवर गुन्हा दाखल!

नळदुर्ग बायपासवर थरार! पोलिसांना धमकावून शासकीय कामात अडथळा; बीडच्या तिघांसह स्थानिक आरोपीवर गुन्हा दाखल!
तुळजापूर (प्रतिनिधी):
नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ प्रतिबंधित गोवा गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर नळदुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना धमकावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संजय जगताप, सचिन पवार, सतीश सोंडगे (रा. पाटोदा, जि. बीड) आणि स्थानिक आरोपी इंद्रजितसिंग ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ मार्च रोजी एका आयशर टेम्पो (MH 16 CD 2395) मधून मानवी आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. फिर्यादी पोलीस कर्मचारी दत्तात्रय कुंभार व त्यांचा स्टाफ कारवाई करत असताना, आरोपींनी “गाडी कशी काय पकडली, तुला बघतो” अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला.
​ मुद्देमाल:-
​गोवा गुटख्याच्या ५० मोठ्या गोण्या
​आयशर टेम्पो व स्विफ्ट कार
​तीन मोबाईल फोन
​एकूण किंमत: ४८,४२,५०० रुपये
​सदर प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सदरील कारवाईमुळे पोलीस कर्मचारी दत्तात्रय कुंभार व त्यांचा स्टाफ यांच्या कामगिरीचे आणि धाडसाचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india