गुरुवाडी येथे विना परवाना अवैध दारु विक्री जोमात तर पीणारे तळीराम कोमात.
———————————————–
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे साफ दुर्लक्ष.
गावातील महीलांना दारु पिणार्या तळीरामुळे अनेक समस्यांना द्यावे लागते तोड…?
उमरगा तालुक्यातील गुरुवाडी येथे देशी,ईंग्लिश अदि दारु विक्री गेल्या अनेक वर्षांपासून गावात अवैध विक्री चालु असताना उमरगा पोलिस प्रशासनाने मात्र दिसुन व कळुन सुद्धा डोळेझाक केल्याने अवैध दारु विक्रेते यांचे चांगलेच उखळ पांढरे होत चालले असुन अवैध दारु विकुन सावकरी सुद्धा दारुविक्री करणार्या कडन होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुरुवाडी गाव हे महाराष्ट्र कर्णाटक सीमेलगत असुन तेथील तरुण वर्ग या काम धंदा शेती याकडे लक्ष न देता दारु पीण्याच्या मार्गाने व्यासनाधीन होऊन दिशाहीन झाल्याने सहजासहजी गावात हर्व प्रकारची दारु मीळत असल्यामुळे तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढुन घराघरात या दारुविक्री मुळे कलह भांडण तंटे वाढत चालल्याने घरातील कलहामुळे महिलांना मानसीक त्रासास सामोरे जाऊन टाहो फोडला जात असताना पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग “मुग गीळुन गप्प असल्याने ” तेरी भी चुप और मेरी भी चुप “या भुमीकेमुळे दारु विक्रेते यांचे चांगलेच फावत असल्याने दुसर्याच्या घरावर नांगर फीरवुन संसारात वनवा पेटवुन अवैध दारू विक्री च्या बळावर अमापसंपत्ती कमवुन संपत्तीच्या जोरावर चार चाकी गाड्या वापरून मौज ,मजा , करत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
गावतील कांही महिला वर्ग दारु वीकु नका तुमच्या दारुमुळे आमच्या घराची राख रांगोळी होवून अनेक समस्यांना संसारात तोंंड दयावे लागत असल्याची प्रतिक्रिया दारु विक्रेते यांच्याकडे मांडताना मी दारु विक्री बंद करणार नाही तुम्हांला कोठे जायचे तेथे जावा आशा परखड भाषेचा वापर होत असल्याने अनेक महीला बघीनीतुन तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.ग्रामपंचायत कार्यालयाकडुन दारूबंदीसाठी अनेकवेळा ठराव घेऊन सुद्धा पोलिस प्रशासन कसलीही कार्यवाहीचा अवलंब करत नसल्याचे गावातील सामाजीक कार्यकर्ते,वरीष्ठ जानकार मंडळी यांच्याकडुन कळते आहे.
उमरगा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय असताना
ग्रामीण भागात आशा अवैध दारुविक्री करणाऱ्या कडे दुर्लक्ष का होत आहे हाही प्रश्न जनतेला भेडसावत असुन या सर्व बाबीकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून गुरुवाडी येथील दारु विक्री वर आळा घालण्यासाठी जनतेची मागणी जोर धरत आहे.
————————————————–
(एकीकडे गुरुवाडी गावात दि.२८रोजी पासुन अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण महंत साधुसंतांचे प्रवचन,कीर्तन अदिसारखे ज्ञानार्जनाचे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दारु विक्री मात्र जोमात सुरु असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे).






