Best News Portal Development Company In India

बहुजन हिताय वसतिगृहात तारांगण, चांद्रयान मोहीम माहिती कार्यशाळा ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

बहुजन हिताय वसतिगृहात तारांगण, चांद्रयान मोहीम माहिती कार्यशाळा.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
सोमवार दि.३० रोजी उमरगा शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह येथे ई ५ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांकरिता नभोमंडळ, तारांगण आणि चांद्रयान मोहीम माहिती उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जालना या पोलाद क्षेत्रात उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या सौजन्याने त्यांच्या तज्ञ् मार्गदर्शक चमू व प्लॅनटोरियम, प्रोजेक्टर व रिफलेक्टर यांच्या श फिरते माहिती यांना उपलबध करण्यात आले होते. चमुंचे प्रमुख श्री दादासाहेब क्षीरसागर यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्लॅनटोरियम आणि प्रोजेक्टर व रिफलेक्टर यांच्या सह्याने आकाशातील तारांगन, नभोमंडळ दाखवून भारत देशाने अलीकडच्या काळात पार पाडलेल्या चांद्रयान एक दोन तीन यांची विद्यार्थी व कर्मचारी व उपस्थिताना विस्तृत माहिती दिली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी धम्मचारी विबोध, अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत कर्मचारी कमलाकर सुरवसे, सौं पद्मिनी सुरवसे व विद्यार्थी उपस्थित होते, या कार्यशाळे मुळे विद्यार्थ्यात नभोमंडळाबद्दल कुतूहल व चांद्रयान मोहीमबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांना प्रश्न विचारले त्याचे अतिशय यथोचित स्पष्टीकरण मार्गदर्शकांनी केले. मार्गदर्शक तज्ञ् मा दादासाहेब क्षीरसागर यांचे वसतिगृहाच्या वतीने प्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी तज्ञाचे व सर्व उपस्थिता चे आभार अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india