हनुमान जयंतीनिमित्त उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री हनुमान मंदिरात जाऊन परम रामभक्त हनुमान यांचे माजी मंत्री बसवराज पाटील घेतले दर्शन.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
या पवित्र दिवशी मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रार्थना केली. हनुमान जयंती हा पराक्रम, भक्ती आणि सेवाभाव यांचा संदेश देणारा उत्सव असून समाजात सद्भावना, एकता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची प्रेरणा या दिवशी मिळते.
यावेळी उपस्थित मान्यवरांसह मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. श्री हनुमानाच्या कृपेने समाजात शांतता, बळ आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना यावेळी केली.
यावेळी मुरूमचे नगराध्यक्ष आदरणीय बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराम शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष शरण पाटील, कैलास शिंदे, हनुमान मंदिर मंडळाचे विश्वस्त ॲड.वैद्य साहेब, जाधव गुरुजी, नितीन डागा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनेक भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हनुमान जयंतीच्या पावन निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या








