Best News Portal Development Company In India

चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मंदिर फुलांनी बहरले; मचे परिवाराकडून आकर्षक पुष्पसजावट !

चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मंदिर फुलांनी बहरले; मचे परिवाराकडून आकर्षक पुष्पसजावट!
​तुळजापूर प्रतिनिधी :-
सध्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिर परिसरात विविध प्रकारच्या देशी-विदेशी फुलांची अत्यंत आकर्षक आणि देखणी सजावट करण्यात आली आहे.
​ही मनमोहक सजावट संजय कुमार मचे (रा. घोडेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने सेवेच्या स्वरूपात करण्यात आली आहे. या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून, दर्शनासाठी येणारे भाविक या फुलांच्या आरासाने भारावून जात आहेत.
​मचे परिवाराचा ‘मंदिर संस्थान’तर्फे गौरव
​श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या या निस्वार्थ सेवेची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने संजय कुमार मचे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा यथोचित सत्कार करण्यात आला. मंदिर प्रशासनाने त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.
​उपस्थित मान्यवर
​या गौरव सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, संस्थानचे विविध विभागांतील कर्मचारी तसेच पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​भाविकांची गर्दी: चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापुरात भाविकांचा ओघ वाढला असून, फुलांनी सजलेले मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. काही किरकोळ प्रकार वगळता गर्दीचे योग्य नियोजन मंदिर संस्थांची जमेची बाजू आहे असे भाविकातून कौतुकास्पद बोलले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india