तुळजाभवानी चरणी बिजापूरच्या भक्ताची अनोखी श्रद्धा; चैत्र पौर्णिमेनिमित्त १ लाख १ हजारांची देणगी अर्पण!
तुळजापूर प्रतिनिधी: भक्ती- शक्तीची देवता आदिमाया-आदिशक्ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. या मंगलमयी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यासह परराज्यातूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने तुळजापुरात दाखल होत आहेत. याच भक्तीच्या ओघात, कर्नाटक राज्यातील बिजापूर येथील एका भाविकाने देवीवरील आपली अपार श्रद्धा व्यक्त करत मंदिर संस्थानला मोठी देणगी अर्पण केली आहे.
भक्तीचा महाकुंभ आणि दानशूरतेचा संगम
बिजापूर येथील रहिवासी श्री. नामदेव शराणाप्पा डांगे यांनी चैत्र पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपला भक्तीभाव व्यक्त करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला १,०१,०००/- (एक लाख एक हजार रुपये) ची देणगी सुपूर्द केली.
संस्थानकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या दातृत्वाचा सन्मान करत मंदिर संस्थानच्या वतीने श्री. डांगे यांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक श्री. अनुप ढमाले,श्री. रामेश्वर वाले,श्री. ओंकार काटकर
यांनी उपस्थित राहून दानशूर भाविकाचे मनःपूर्वक आभार मानले व देवीचा प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला.
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापुरात भाविकांची मोठी मांदियाळी असून, अशा दातृत्वामुळे मंदिर परिसरातील सेवा-सुविधांना बळकटी मिळते, तुळजापुरात येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी याचा योग्य वापर करण्यात येतो . अशी भावना प्रशासनाने व्यक्त केली आहे.






