Best News Portal Development Company In India

अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगारांना गृह उपयोगी किट वाटप* अविनाश जोशी/करमाळा !

*अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगारांना गृह उपयोगी किट वाटप*
अविनाश जोशी/करमाळा
शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या 31 मार्च रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आगळा वेगळा उपक्रम म्हणून वाढदिवसानिमित्त वायपट खर्च न करता कामगारांची गरज ओळखून गरजू बांधकाम कामगारांना गृहउपयोगी किट (भांडी) वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम हा अमोल जाधव यांच्या करमाळा शहरातील गायकवाड चौक येथील संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला

या गृहपयोगी वस्तूमध्ये एकूण 30 वस्तू दिल्या आहेत. यामध्ये ताट -4, वाट्या -8, ग्लास-4, पातेले – 3, मोठा चमचा -2, जग -1, मसाला डबा -1, डबे -3, परात -1, प्रेशर कुकर -1, कढई – 1, टाकी – 1 या वस्तूंचा समावेश आहे.
बांधकाम कामगार हा सातत्याने स्थलांतरित करीत असतो. एका साईटवरील काम संपले की नवीन बांधकामाच्या ठिकाणी अगदी कुटुंबासह अनेक बांधकाम कामगार जात असतात. अशावेळी अनेक अडचणींचा या बांधकाम कामगारांना सामना करावा लागतो. अगदी निवासस्थानाची सोय, पाल्यांचे शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्या यांची मोठी गैरसोय होत असते, पण यातूनही या बांधकाम कामगारांच्या संसाराला वेगळ्या पद्धतीने हातभार लागण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला आहे असे यावेळी जाधव यांनी व्यक्त केले

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india