उमरगा जनता बँकेने आरबीआयच्या सर्व निकषांचे पालन करुन सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
३१ मार्च २०२६ अखेर बॅंकेकडे २४२ कोटींच्या ठेवी असुन १६१ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. बँकेकडे ९ कोटी २३ लाखाचे भागभांडवल असून तर राखीव निधी २३ कोटी आहे. बँकेचे खेळते भांडवल २८६ कोटी, गुंतवणूक ८२ कोटी असुन संपलेल्या आर्थिक वर्षात ५ कोटीचा नफा मिळाल्याची माहिती बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी दिली.
लोकनेते बसवराजजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा जनता बँक यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे. उमरगा जनता सहकारी बँकेने अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली आहे. झपाट्याने प्रगती करत असलेली व तत्पर सेवा देणारी बँक म्हणून आज उमरगा जनता बँकेकडे पाहिले जाते. बँकेने खातेदारांच्या सोईकरिता सोने तारण कर्ज, सोलार कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, सुवर्ण अलंकार कर्ज व सौर गृह प्रकाश योजना, मराठा तरुणांना व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज माफक व्याजदराने वाटप करण्यात येत आहे. बँकेकडे क्यू आर. कोड, आय. एम. पी. एस., नॅच आदी सुविधा सुरू असुन युपीआय सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात बॅंकेकडे २४२ कोटींच्या ठेवी असुन सभासदांना १६१ कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. खेळते भांडवल २८६ कोटी, गुंतवणूक ८२ कोटी असुन बँकेचा स्वनिधी मध्ये देखील चांगली वाढ होऊन स्वनिधी रु. ३२.२२ कोटी झाला असुन बॅकेला चालू आर्थिक वर्षात ४.५५ कोटी रुपये ढोबळ नफा झाला आहे. सभासदांच्या सहकार्याने बॅकेचे नेट एन. पी. ए. केवळ १.६९ टक्के राखण्यात यश संपादन केले आहे.
बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. बँकेने आरबीआयच्या सर्व निकषांचे पालन केले असून बँकेने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेची नवीन शाखा लातूर येथे चालू केली आहे. बॅकेच्या उमरगा, मुरुम, जेवळी, कासारशिरसी, जळकोट, सोलापूर व लातुर येथे शाखा आहेत. बॅंकेकडे एस एम एस, आरटीजीएस, एन ई एफ टी, कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. पुढील वर्षात सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक यांच्या सहकार्याने बँकेचा एनपीए ० टक्केवर आणण्याची आशा व्यक्त करुन ग्राहकांचा बँकेवर असणारा विश्वास यामुळे बँकेने ठेवी मध्ये मोठी झेप घेतल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले.






