बादोला (बु.) या ठिकाणी प्रबोधनकार भीम शाहीर अनुरूध्द बनकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन : सर्व आंबेडकरी अनुयायाना उपस्थित राहण्याचे आवाहन
—————————————————-
जळकोट (अरुण लोखंडे):
सोलापूर जिल्ह्यातील बादोला ता.अक्कलकोट या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दि.२५ एप्रिल २o२६ रोजी सायंकाळी ठिका ७.०० वा.समाज प्रबोधनपर थोर प्रबोधनकार भीम शाहीर अनिरुद्ध बनकर यांच्या भिमगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बादोला ता.अक्कलकोट येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परम पूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्वकृत्वाने उद्योग जगतात आपला वेगळा ठसा उमटविणारे शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक दत्ता गायकवाड (बादोला-पूणे ) व भिम क्रांती तरुण मंडळ बादोला यांच्या पुढाकारातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दि.२५ एप्रिल २०२६ रोजी बादोला (बु.) या ठिकाणी आपल्या मधुर वाणीतून पहाडी आवाजातून बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचविणारे थोर प्रबोधनकार भिम शाहीर अनिरूद्ध बनकर यांच्या भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ७.oo वा.करण्यात आले आहे.
तरी अक्कलकोट तालुकासह सोलापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी अनुयायानी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दत्ता गायकवाड सह भिम क्रांती तरुण मंडळ बादोला यांच्या वतीने करण्यात येत आहे.






