चिंचकोट( ल.)येथे अखंड हरिनाम सप्ताहास उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांची स्नेह भेट.
तुरोरी दमयंती भालेराव.
उमरगा तालुक्यातील मौजे चिंचकोट येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा हा सप्ताह गावकऱ्यांसाठी श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. या पवित्र सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास उमरगा जनता बँकेचे चेअरमध शरण पाटील यांनी भेट देत उपस्थिती दर्शविण्यात आली.
यावेळी अचलबेट देवस्थानचे ह.भ.प. हरी लवट महाराज यांचे प्रेरणादायी कीर्तन ऐकलो. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून संत साहित्य, वारकरी परंपरा, तसेच अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावातील सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, तसेच वारकरी परंपरेतून समाजात सकारात्मक विचारांची जागृती घडते. गावातील नागरिक आणि भाविकांनी अत्यंत उत्साहाने या सप्ताहात सहभाग घेण्याचा आनंद घेण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, अँड.दिलिप सगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, पंचायत समिती माजी सभापती सचिन पाटील, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय सोनकटाळे, अनिल सगर, तुकाराम मंमाळे, शाहूराज भोसले, माजी नगरसेवक महेश माशाळकर, गोविंद सूर्यवंशी, बालाजी पाटील, संजय आमाशेट्टी, व्यंकट बिराजदार, नाथ कमलापुरे, उदयभान बिराजदार, श्री. कालिदास पाटील, श्वेता दयानंद बिराजदार, गिरीष पाटील यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








