माडज येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमीपूजन माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
मौजे.माडज ता.उमरगा येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी २०२४ साली तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना व मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे २०१५ या योजनेअंतर्गत४० लक्ष रुपये निधी मंजूर झालेला होता.
या कामाचे भूमिपूजन गुरुवार दि.०२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मा.आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, रामकृष्ण बिराजदार, माडज पंचायत समिती सदस्य मन्मथ स्वामी, सरपंच सौ.सारिका संतोष पाटील, उपसरपंच बलभीम काळे, दिलीपसिंह गौतम, चेअरमन राजेंद्र माने, उपतालुकाप्रमुख नरेंद्र माने, माजी चेअरमन रमेश माने, राम पाटील, अप्पाराव गायकवाड, राम माने, मधुकर माने, शरद माने, संतोष पाटील, काका गायकवाड, रवी पाटील, अज्ञान पाटील आदींसह माडज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






