Best News Portal Development Company In India

माहामाता त्याग मूर्ती रमाई आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२० वा लग्न वाढदिवस कार्यक्रम संपन्न !

माहामाता त्याग मूर्ती रमाई आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२० वा लग्न वाढदिवस कार्यक्रम संपन्न
– – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रमाई महीला मंडळ व युगपुरुष तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माहामाता त्यागमूर्ती रमाई आंबेडकर आणि देशाचे दिग्विजय नेते भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा विवाह ४ एप्रिल १९०६ रोजी मुंबई भायखळा येथील मच्छी मार्केट येथे मोठ्या थाटा माटात संपन्न झाला होता त्यांच्या लग्नला १२० वर्ष पूर्ण झाले असून त्याच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आला
कार्यक्रमांच्या सुरुवातीस माहमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन अभिमन्यू लोखंडे प्रकाश लोखंडे हरिदास लोखंडे जीवन गुळे यांच्या हस्ते पुष्पहार अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलीत करून करण्यात आले तर माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुजन पंचशिला लोखंडे वनिता लोखंडे लता माने सुमन लोखंडे हिरा लोखंडे या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक रित्या त्रिशरण पंचशिल घेण्यात आले . व बालीका लावण्या अवनी यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी राधिका लोखंडे ज्योती लोखंडे सोनल भालेराव वर्षा गायकवाड अविधा लोखंडे जया माने प्रज्ञा माने श्यामल लोखंडे साधना लोखंडे कांचन लोखंडे मनिषा गायकवाड सपना गायकवाड मंगल गायकवाड गोकर्णा लोखंडे शांताबाई लोखंडे सुरेखा लोखंडे छबू गायकवाड छाया लोखंडे अस्मिता लोखंडे श्यामल सोनकांबळे बबीता लोखंडे सुनिता बनसोडे . संयोजन समितीचे परमेश्वर लोखंडे अरविंद लोखंडे सागर लोखंडे विनोद लोखंडे दामोदर लोखंडे पाडूरंग लोखंडे यशवंत गायकवाड सुनिल माने लक्ष्मण लोखंडे योगेश लोखंडे प्रदिप लोखंडे शितल माने युवराज लोखंडे संजय गायकवाड आकाश लोखंडे विजय गायकवाड झानेश्वर लोखंडे भिमनगर मधील बौद्ध उपासक उपासिका युवक युवती अबालवृद्ध व्यक्ती सह . युगपुरुष लेझीम संघाचे खेळाडू यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मिठाईचे वाटप करून फटाक्याची अतिषबाजी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमांचे प्रास्ताविक अरुण लोखंडे यांनी केले तर सुत्रसंचलन आभार सतिश माने यानी मानले

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india