मुरुम येथे माजी मंत्री तथा लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमीत्त नगराध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण.
उमरगा लोहारा आदिनाथ भालेराव.
११ कोटींहून अधिक सभासद असलेला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचा ४६ वा स्थापना दिवस आज देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने मुरूम येथील माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शहरासह आसपासच्या पंचक्रोशीतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पक्षाचा ध्वज फडकावत देशसेवा, राष्ट्रहित आणि जनकल्याणाच्या विचारांना पुनश्च एकदा वचनबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे ऊर्जा व प्रेरणा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
१९८० साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाची सुरुवात अत्यंत खडतर परिस्थितीत झाली होती. प्रारंभीच्या काळात पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ दोन खासदारांवर समाधान मानावे लागले होते. मात्र राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणारी विचारधारा, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांची निष्ठा या बळावर भारतीय जनता पक्षाने सातत्याने आपली वाटचाल पुढे चालू ठेवली. देशातील कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि जनतेच्या विश्वासामुळे आज भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो.
गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने देशभरात सर्वात मोठा पक्ष म्हणून यश संपादन केले आहे. केंद्रात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे. राष्ट्रहित, सुशासन, विकास आणि सर्वसमावेशक प्रगती या तत्वांवर आधारित कार्यामुळे भारतीय जनता पक्षाला देशभरातील जनतेचा मोठा पाठिंबा लाभत आहे. हे यश म्हणजे केवळ निवडणुकीतील विजय नसून, ते लाखो-कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या कष्टांचे आणि त्यांच्या पक्षनिष्ठेचे प्रतीक आहे.
या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची विचारधारा अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा, संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने राष्ट्रहिताला प्राधान्य देत समाजसेवेच्या भावनेने कार्य करावे, अशी प्रेरणादायी भावना यावेळी व्यक्त केली.
आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मुरूमचे नगराध्यक्ष बापूरावजी काका पाटील, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, मुरूम भाजप शहराध्यक्ष गणेश अंबर, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, सचिन फनेपुरे, राजकुमार अंबुसे, सुजित शेळके, शाहूराज भोसले, गौस शेख, प्रकाश कंटेकुरे, अमर भोसगे श्री भरत गायकवाड, राजू मुल्ला, सूर्यकांत पाटील, इंगळे सर, श्रीराम कुलकर्णी, प्रकाश भोसगे, झाकेर जमादार, रूपचंद गायकवाड, विकास बिराजदार, शिवा दुर्गे, अण्णाराव पाटील, तुकाराम मंमाळे, अरविंद बोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.






