Best News Portal Development Company In India

नळदुर्ग येथे वाहतूक नियंत्रक महेश डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन !

नळदुर्ग येथे वाहतूक नियंत्रक महेश डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन
——————————————————
नळदुर्ग (एस.केगायकवाड):
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुळजापूर अगार अंतर्गत येणाऱ्या नळदुर्ग बस स्थानक येथे सेवेत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष वाहतूक नियंत्रण महेश डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवासी ग्रामस्थ,महामंडळाचे कर्मचारी, पत्रकार यांच्या वतीने बस स्थानकातच अभिष्टचिंतन करण्यात आले.
नुकताच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ बसस्थानक सुंदर बस स्थानक या स्पर्धेमध्ये नळदुर्ग बस स्थानकाचा प्रथम क्रमांक आला. या स्पर्धेमध्ये वाहतूक नियंत्रण महेश डुकरे यानी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यामुळेच नळदुर्ग बस स्थानकाचा स्वच्छता स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. महेश डुकरे हे आपली सेवा करत करत सामाजिक कार्यात ही सक्रिय आहेत.आपल्या राज्य परिवहन महामंडळातील वाहतूक नियंत्रक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करतात त्यामुळे एक वेगळी शिस्त या बसस्थानकात दिसून येते. त्यांचा दि.६ एप्रिल हा जन्मदिन बस स्थानकातचं त्यांची सेवा चालू असतानाचं महामंडळातील वाहक,चालक कर्मचारी हितचिंतक मित्रपरिवार यांनी अभिष्टचिंतन केले तर शीघ्रकवी प्रदीप पाटील बसवंतवाडीकर यांनी त्यांच्यावर काव्यरचना करून गीत गायनाच्या माध्यमातून अभिष्टचिंतन केले.
. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार इरफान काझी,रिपाइं (आठवले) तथा पत्रकार एस.के.गायकवाड वाहक काशिनाथ कुंभार सह महामंडळातील कर्मचारी प्रवासी ग्रामस्थ उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india