Best News Portal Development Company In India

शिवशंभू सोशल फाउंडेशनचा भव्य उपक्रम ; होम मिनिस्टर हा रंगतदार कार्यक्रम संपन्न गावातील महिलांच्या उस्पूर्त पणे प्रतिसाद !

शिवशंभू सोशल फाउंडेशनचा भव्य उपक्रम; होम मिनिस्टर हा रंगतदार कार्यक्रम संपन्न गावातील महिलांच्या उस्पूर्त पणे प्रतिसाद
– – – – – – – – – – – – – – – – – – – – जळकोट ( अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवशंभो सोशल फांडेशन यांच्या वत्तीने जागतीक महिला दिनांचे अविचित साधून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आनंदीदायी वातावरणात संपन्न झाला .
कार्यक्रमांच्या सुरुवातीस राष्ट्माता माँ जिजाऊ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिल्याच्या शिक्षणाची जणनी सावित्रीमाई फुले त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमाचे पुजन पचायत समीतीच्या माजी उपसभापती सौ सुनिता पाटील महादेवी रेणुके सुर्वणा गंगणे कविता भोगे उषा गंगणे सुमित्रा पवार क्षितीजा पाटील दामिणी कदम उज्वला पवार वैष्णवी हत्ते सोनाली कदम या महिलांच्या हस्ते मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलीत करून पुष्पहार घालून पूजन करण्यात आले . त्यानंतर गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर गावातीलच दयानंद साखरे याची मुलगी साक्षी साखरे ही मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याने तिच्या आईचा सन्मान करण्यात आला . त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले होम मिनिस्टर मानाची पैठणी या कार्यक्रमाचे भारदार निवेदन निवेदक भारत मुंढे (मंगळवेडा ) यानी त्यांच्या खास शैलीत महिलाना बोलकं करून त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणाला वाव देण्याचे कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले . महिला तरुण युवती यांनी”शांता बाय या गाण्यावर ठेका धरून धमाल नृत्य केले . व कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला .या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन संयोजन समितीने केले होते . होम मिनिस्टर पैठणी स्पर्धेत मीरा कांबळे या महीला प्रथम आली असुन तिला पैठणी साडी देण्यात आली तर द्वितीय क्रमांक अश्विनी भोसले तृतीय क्रमांक नेहा अंगुले चौथा क्रमांक भाग्यश्री जाधव तर पाचवा क्रमांक रूपाली भोसले सर्व विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करून त्यांनां उतेर्जनाथ बक्षिस देण्यात आले . या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी भरभरून आनंद व्यक्त करून प्रतिसाद दिला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंभो फांडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील सुदर्शन पवार रोहीत शिंदे प्रसाद हत्ते अनिरुद्ध कदम ओंकार पाटील ओंकार इंगवे सुशांत गंगणे अजय गंगणे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार निवेदक विश्वास भोगे यांनी मानले कार्यक्रमात भव्य अतीष बाजी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india