Best News Portal Development Company In India

मुक्या प्राण्यांचा छळ : दहा घोड्यांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या आंध्रप्रदेशातील चालकावर नळदुर्ग पोलिसांची कारवाई !

मुक्या प्राण्यांचा छळ : दहा घोड्यांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या आंध्रप्रदेशातील चालकावर नळदुर्ग पोलिसांची कारवाई!
​तुळजापूर (प्रतिनिधी):
मुक्या प्राण्यांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयी वागणूक देऊन त्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका पिकअप चालकावर नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीच्या दहा घोड्यांची (खेचर) सुटका केली असून वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे.
​दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:२० वाजेच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांना गस्त घालत असताना अणदुर येथील बसस्थानकासमोरील ब्रिजच्या खाली एक संशयास्पद पिकअप (क्र. AP 39 WH 3440) आढळून आली. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता, त्यात अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे दहा घोडे (खेचर) भरलेले असल्याचे दिसून आले.
​या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक भाशाखॉजा शेख (वय २२ वर्षे, रा. १/१४२ येमीनेनीवरपालक, ता. चेरुकुपाल्ली, जि. गुंटुर, राज्य- आंध्रप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.
​तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपीने या प्राण्यांना चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय न करता, केवळ आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे लांबच्या प्रवासावर नेले होते. प्राण्यांना श्वास घेण्यासही त्रास होईल अशा पद्धतीने वाहनात कोंबण्यात आले होते.
​याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद घेऊन आरोपीविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.​प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, कलम ११(१)​मोटार वाहन कायदा ,कलम १७७​ महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम, कलम ८३
​ “प्राण्यांची अशा प्रकारे बेकायदेशीर आणि निर्दयी वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा घटना आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.” मुक्या जनावरांची काळजी घेण्यात यावी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india