नंदगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील सह सभापती,उपसभापती प.स./ जि. प. सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न
—————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे जिल्हा परिषद धाराशिव चे नूतन अध्यक्ष,सभापती उपसभापती जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य आदी मान्यवरांचा सत्कार सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा परिषद धाराशिवच्या अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, पंचायत समिती तुळजापूरचे नुतन सभापती विक्रमसिंह देशमुख उपसभापती
सौ.रोहिणीताई विवेकानंद मेलगिरे यांच्यासह नूतन जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आदींचा तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जि.प.गटातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने नंदगाव येथे नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी धाराशिव जिल्हा परिषदच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचे नंदगाव नगरीत आगमन होताच फटाक्याची अतिषबाजी करत जेसीबी वरून फुलांची उधळण करून ढोल ताशाच्या गजरात हलगीच्या निनादात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.तर सचिन सिद्धेश्वर कोरे यांच्या प्रास्ताविकानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील,जिल्हा परिषदचे नुतन अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर अण्णा कोरे,पंचायत समिती तुळजापूर चे सभापती विक्रमसिंह देशमुख,उपसभापती सौ. रोहिणीताई विवेकानंद मेलगिरे, काटगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती माळी, काक्रंबा जि.प. गटातुन निवडून आलेले दयानंद शिंदे,सिंदफळ गटातून विजयी झालेल्या शितल आनंद ढाले,काठी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या अशा ब्रह्मदेव भाले, खुदावाडी पंचायत समिती गणातून विजयी झालेले भिवाजी इंगोले,जळकोट पंचायत समिती गणातून विजयी झालेले आशिष गणेश सोनटक्के आदींचा येथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अर्चनाताई पाटील म्हणाले की सिद्धेश्वर अण्णा कोरे यांच्या एकनिष्ठ आणि प्रामाणिक पणे केलेल्या आणि करत असलेल्या कामाचे फळ त्यांना मिळालेले असून जिल्ह्यापरिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती म्हणून ते आज जिल्हा परिषदेमध्ये विराजमान झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आणि आमदार राणा दादांच्या मार्गदर्शनाखाली केवळ नंदगाव गटाचा नव्हे तर तुळजापूर तालुक्यातील सर्व गावातील विकास कामाला गती देण्याचा मी जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने प्रयत्नशील आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे,दिलीप तात्या समोसे,नळदुर्ग नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवेश्वर आप्पा धरणे,माझी पंचायत समिती सदस्य महादेव सालगे, नंदगावचे सरपंच शषिकांती नागीले, रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,भाजपा मिडीयासेलचे तालुकाअध्यक्ष किशोर धुमाळ, पत्रकार निजाम शेख सह नंदगाव घाटातील सर्वगावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले.

.
.






