पुण्यातील भाविकाची तुळजाभवानी चरणी सुवर्णसेवा; ५१ ग्रॅमचे मंगळसूत्र अर्पण!
तुळजापूर प्रतिनिधी:-अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री तुळजाभवानी चरणी पुण्यातील भाविक
आई राजा उदो उदो… च्या जयघोषात पुणे जिल्ह्यातील एका भाविक भक्ताने श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी सोन्याचे मंगळसूत्र अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यातील सोरपटवाडी (गणेश नगर) येथील रहिवासी मनिषा अंकुश धामे यांनी आज हे दान मंदिर संस्थानाकडे सुपूर्द केले. शक्ती – भक्तीचा अनमोल नजराणा
मनिषा धामे या आज आपल्या सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आल्या होत्या. मुखदर्शन आणि विधीवत पूजेनंतर, त्यांनी देवीप्रती असलेली आपली कृतज्ञता म्हणून ५१.८४० ग्रॅम वजनाचे सुवर्ण मंगळसूत्र देवीच्या चरणी अर्पण केले.
संस्थानकडून सन्मान
मंगळसूत्र अर्पण करतेवेळी मंदिर संस्थानच्या वतीने या दानाचा स्वीकार करण्यात आला. यावेळी धार्मिक विभागाचे विकास वाणी, महेश गंजे यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते. देवीच्या चरणी अर्पण केलेल्या या दानाचे आणि धामे कुटुंबाच्या भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुळजाभवानी मातेचा महिमा अपरंपार आहे भक्तांच्या नवसाला पावणारी आई म्हणून साऱ्या जगात तिची ओळख आहे. भाविक भक्त असे दानधर्म करून पुण्य पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भाविकांच्या भक्तीचा आदर करत त्यांच्या या दातृत्वाचा सन्मान राखत सर्व भक्तांना योग्य ती सेवा देण्याचा प्रयत्न करत असते.






