Best News Portal Development Company In India

क्रांतीसूर्य माहात्मा ज्योतीराव फुले याची १९९वी जयंती साजरी !

क्रांतीसूर्य माहात्मा ज्योतीराव फुले याची १९९वी जयंती साजरी .
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती समीती व युगपुरुष तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाचे जनक थोर समाज सेवक क्रांती सूर्य माहात्मा ज्योतीराव फुले याची १९९ वी जयत्ती मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांती सूर्य माहात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन शालेय मुली अर्पिता लोखंडे आदिती माने अंजली लोखंडे कल्याणी लोखंडे यांच्या हस्ते दिप धूप पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन प्रतिभा लोखंडे समृद्धी भालेराव देवयानी लोखंडे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले . त्यानंतर पत्रकार अरुण लोखंडे यांनी माहात्मा ज्योतीराव फुले व माता सावित्री बाई फुले याच्या विषयी विचार व्यक्त करताना म्हणाले की या देशातील मुली शिकल्या पाहिजे म्हणून त्यानी मुलीची पहिली शाळा पुण्यात भिंडे वाडयात चालू केली स्वः ता सावित्री माईना शिक्षीत केले आणि सावित्री माई ही मुलीना शिकवू लागली पुण्यातील कर्मठ ब्राह्मण समाजाने मुलीच्या शिक्षणाला विरोध केला सावित्री माईना शेण चिखल मारले बऱ्याच वेळा आपमानित केले पण त्या जराही खचल्या नाहीत आधिक जोमाने त्या शिक्षण रूपी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्या म्हणून आज मुली सुशिक्षीत होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेतल्याचे चित्र आपणास पहावयास मिळते आहे ते फक्त आणि फक्त माहात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्री माई फुले यांच्यामुळे म्हणून भारतीतील पहिल्या शिक्षीका म्हणून सावित्री माईची गणना होते तर माहात्मा फुले याना शिक्षणाचे जनक म्हणटले जाते असे ते म्हणाले .
त्यानंतर शालेय मुलीनी ही आपले विचार व्यक्त केले . या कार्यक्रमास अरविंद लोखंडे परमेश्वर लोखंडे सागर लोखंडे अजय लोखंडे शुभम पासोडे रोहीत माने विशाल माने सुमंत लोखंडे ज्ञानेश्वर लोखंडे युवराज लोखंडे . ओमकार भालेराव संविधान लोखंडे प्रणिता लोखंडे पंचवी गायकवाड श्रुत्ती भालेराव अनुष्का लोखंडे श्वेता गायकवाड सानिका माने सलोनी माने सोनाली लोखंडे अस्मिता लोखंडे अंतरा लोखंडे असावरी लोखंडे श्रावणी वाघमारे सांची लोखंडे आकांक्षा लोखंडे . सरीता लोखंडे संजना कांबळे रिना भालेराव सोनल भालेराव नम्रता माने सह भिमनगर मधील महीला पुरुष शालेय मुले मुली उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार सतिश माने यानी मानले

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india