उमरगा येथील पत्रकार बालाजी वडजे यांना पुरस्कार करुन सपत्नीक सन्मान.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते बालाजी वडजे कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
उमरगा : मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा स्तरावर घेण्यात आलेल्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी शोध वार्ता गटात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल रविवारी (दि.१२) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बालाजी वडजे यांचा सपत्नीक सत्कार करुन पुरस्कार देण्यात आला.
सर्वसामान्य जनतेला कमी दराने दरमहा धान्य मिळावे यासाठी शासनाने तहसील विभागामार्फत सदरचा माल सर्व गोरगरीब जनतेला वाटप करण्यासाठी गाववाईज लोकसंख्येच्या प्रमाणात स्वस्त धान्य दूकान काढुन माल वितरणाची व्यवस्था करण्यात आली. पण महसूल विभागातील या यंत्रणेला भ्रष्टाचाराचे भिरुड लागल्याने सदरचा माल चढया दराने काळया बाजारात विक्री करण्याचा स्वतंत्र व्यवसायच काही दलालांनी सुरू करुन लोहारा तालुका गोडावुनमधील मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघड झाले आहे. याबाबत दैनिक पुण्यनगरीने मालिका प्रकाशित केली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या मार्फत व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त या दोन्ही चौकशी पथकामार्फत शासकीय धान्य गोदामाची तपासणी केली असता ३५८ क्विंटल गहु व २०८ क्विंटल तांदळ ज्याची किंमत १५ लाख १८ हजार ९१२ रुपयेचा अपहार झाला आहे. लोहारा तालुक्यातील राशनच्या मालात घपळा झाल्याबाबत दै. पुण्यनगरीने मालिका प्रकाशित केल्यानंतर गोदामपालावर गुन्हा दाखल करुन चौकशी समिती नेमली होती. या समितीने ४ जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, २ नायब तहसीलदारासह ११ जणांविरुद्ध अनियमितेचा ठपका ठेवून १५ लाख १८ हजार ९१२ रुपये त्यांचे पगारातुन वसुलसह शिस्तभंगाची कार्यवाहीची शिफारस केली होती. याची स्वतंत्र मालिका लावून प्रकरण तडीस नेले होते. या यशस्वी मालिकेसाठी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दै. पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी बालाजी वडजे यांना मराठवाडा स्तरावरील कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिताध शोध वार्ता गटात प्रथम पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. रविवारी (दि.१२) धाराशिव नगरपालिका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बालाजी वडजे यांचा सपत्नीक सत्कार करुन पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक होते. यावेळी माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे आदी उपस्थित होते.






