Best News Portal Development Company In India

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण* *माहिती व जनसंपर्क विभाग*

*कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण*
*माहिती व जनसंपर्क विभाग*
pro@kdmc.gov.in

*वृत्त विशेष क्र. – ०३*
*दि: ११/०४/२०२६*

*थोर समाज सुधारक “महात्मा ज्योतिबा फुले” यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !*

*”महात्मा ज्योतिबा फुले”* यांच्या जयंतीदिनी आज महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिका महापौर हर्षाली चौधरी व महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहा.जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत व इतर अधिकारी/कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

तदनंतर कल्याण मधील महात्मा फुले चौक येथील *”महात्मा ज्योतिबा फुले”* यांच्या पुतळयासही महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

डोंबिवली (पश्चिम) रेल्वे स्थानका जवळील *”महात्मा ज्योतिबा फुले”* यांच्या पुतळयास महापालिका उप महापौर राहुल दामले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापालिका उपायुक्त वंदना गुळवे, पालिका सदस्य नंदू म्हात्रे, समीर चिटणीस, मृदुला नाख्ये, 7/ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत व इतर इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india