Best News Portal Development Company In India

तुरोरी येथे कँप्टन हणुमंत जाधव व जि.प.सदस्या अर्चना युवराज जाधव यांचा सत्कार. तुरोरी दमयंती भालेराव.

तुरोरी येथे कँप्टन हणुमंत जाधव व जि.प.सदस्या अर्चना युवराज जाधव यांचा सत्कार.
तुरोरी दमयंती भालेराव.
दि.१३येथील व्यापारी महासंघ व तुरोरी व्यापारी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने रविवारी दि.१२ माजी सैनिक,नुतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पोलिस निरीक्षक (उत्पादन शुल्क)‌ आदींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
येथील श्री ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरोरी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अभिजित जाधव माडीवाले होते तर कार्यक्रमास अचलबेट देवस्थानचे हरी लवटे गुरुजी,तुरोरी व्यापारी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक तात्या जाधव कारभारी, उपाध्यक्ष प्रशांत आबा जाधव पाटील, सचिव बालाजी माणिकवार, संचालक बालाजी जाधव, गणेश माळी, संजय पवार, बालाजी पवार, चैतन्य जाधव,उमर कुरेशी, ज्ञानेश्वर काजळे,रावण सुर्यवंशी, उर्मिला पवार, सुनंदा बाळेकर आदींसह राजेंद्र पवार, चंद्रकांत बाळेकर, भाजप तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पूजा माणिकवार, लक्ष्मी जाधव,सरोजा पवार, सोनाली जाधव, अर्चना बाळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय सैन्य दलातून कॅप्टन पदावरून जामनगर (गुजरात) येथून गेल्याच महिन्यात ३२वर्षे ८ महिने सेवा करून सेवानिवृत्त झालेले हणमंत जाधव,०२ एप्रिल रोजी उत्पादन शुल्क विभात उपनिरीक्षक पदावर विराजमान झालेले संतोष कलमले जिल्हा परिषदेच्या व स्थायी समितीच्या सदस्या सौ अर्चना जाधव, पंचायत समिती सदस्य तुकाराम भैय्या जाधव, पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, युवा उद्योजक काजळे आदिंचा नेत्रदीपक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी तर आभार श्री माणिकवार यांनी मानले. कार्यक्रमास माजी उपसभापती युवराज दाजी जाधव, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,माजी उपसरपंच पंडित शिंदे, शशिकांत बाळेकर, संतोष गौरशेट्टी ,रौफ सौदागर, नंदकुमार पाटील, तुकाराम पाटील, दिपक तपसाळे, तुकाराम गायकवाड राजकुमार माणिकवार, वैजनाथ शिलवंत, कमलाकर लवटे, विश्वनाथ माने, विश्वनाथ ख्याडे , शशिकांत ख्याडे ,फजलेअहेमद पिरजादे, कमलाकर लवटे,पंचप्पा ख्याडे श्रीहरी बिराजदार, ज्ञानेश्वर पाटील, एकनाथ माने, वैजनाथ माने, सुरेश मुगळे यांच्यासह व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india