Best News Portal Development Company In India

बारुळ ग्राम पंचायत कडून मारुती बनसोडे यांचा सत्कार !

बारुळ ग्राम पंचायत कडून मारुती बनसोडे यांचा सत्कार
—————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील परिवर्तन सामाजिक संस्था बोरगाव/नळदुर्ग चे संस्थापक सचिव तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन सामाजिक न्यायमंत्री मा. ना. संजयजी शिरसाट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याबद्दल ग्राम पंचायत बारुळ च्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पती शहाजी अण्णा सुपनूर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, ग्राम पंचायत सदस्य सुनील नवगिरे, सेवा निवृत्त सहाय्यक फौजदार महेश ठोंबरे, केशव नवगिरे, पोलिस पाटील शिवाजी सगर, चंद्रकांत वटे, हनुमंत टोपे इत्यादी उपस्थित होते. यावेळी मारुती बनसोडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले यांनी ग्रामस्थाना दिली

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india