उमररगा तालुक्यात पाण्याच्या शोधात वन्यजीव प्राणी वानर या वन् प्राण्यांचे झाले गावात वावर.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
अनेकांच्या घरावरील पत्र्याची वानरामुळे नासधूस.
एक वानराचे बाळ (बछुडे) विजेच्या तारेस लटकुन म्रुत्यु, तर दुसरे वानर विजेच्या खांबावरुन खाली पडुन जखमी वानराची म्रुत्युशी झुंज.
तालुक्यातील आष्टा ( जहागीर) येथे भिम नगर परिसरात दि.१४रोजी ४ते ५ दरम्यान समाजसेवक कमलाकर सुर्यवंशी यांच्या घरासेजारी विजेच्या तारेला वानराचे लहान पिल्ल्यास विजेचा शाँक लागल्याने तारेला लटकुन मरण पावले तर दुसरे वानर विजेच्या तारेचा शाँक लागुन खाली कोसळल्याने जखमी होवून मरणाशी झुंज देत असताना समाजसेवक कमलाकर सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयाने कुत्र्यापासुन वानराचा बचाव करण्यात आला.
घडलेल्या वानराच्या म्रुत्यु बाबत वनविभागाच्या कर्मचारी यांना कळविले असता कांही तासाने मुळज मंडळचे वनपाल दिनेश वाघमारे यांनी पेट्रोलींगची गाडी घटनास्थळी घेऊन येउन वनमजुर नामदेव जमादार,राम सोमवंशी यांच्या सहाय्याने विजेच्या तारेला लटकुन मयत वानराच्या पिलास लाकडी भाल्याने खाली उतरवुन व मरणाशी झुंज देत असलेल्या दुसर्या वानरास उपचारासाठी हलविण्यात आले असुन उमरगा येथील पशुवैद्यकीय दाखाण्यात उपचार करण्यात आला व कुनहाळी येथे ठेवण्यात आले असल्याचे वनपाल दिनेश वाघमारे यांनी तुळजाई एक्स्प्रेस शी संवाद साताना सागीतले.
वन्य जीवप्रणी यांना विना परवाना अवैध अमाप व्रक्ष तोडीमुळे शेतशिवारात सावलीचे छत्र हरपल्याने वावर सोडुन गावाकडे सावलीसाठी व पाण्याच्या शोधात जीव गमवावा लागत असुन या वन्यजीव प्रण्याच्या सौरक्षणाजी व अवैध व्रक्ष तोडीस आळा घालण्यासाठी जिँल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्यासाठी जनतेची मागणी जोर धरत आहे.







