मुरूम येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
उमरगा लोहारा आदिनाथ भालेराव.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मुरूम येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त शहरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये,शाळा,महाविद्यालयात,पालिका सभागृहात,पोलिस ठाण्यात तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रारंभी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त साखर सहसंचालक डी आय गायकवाड हे होते.याप्रसंगी नगराध्यक्ष बापूराव पाटील,युवा नेते शरण पाटील,उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण,नगरसेवक रुपचंद गायकवाड,जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष मदन गायकवाड, उपाध्यक्ष अमोल बनसोडे, कोषाध्यक्ष प्रा अण्णाराव कांबळे,सचिव आनंद गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी बसवराज पाटील,डी आय गायकवाड, शरण पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला.
मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष मदन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.प्रा डॉ सिद्धार्थ मुरूमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रा महेश कांबळे यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर डी आय गायकवाड परिवाराकडून स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला भीमसैनिक,माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन*
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने दि 15 रोजी निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,दि 18 रोजी मंजुषा शिंदे यांचा संगीत रजनी कार्यक्रम, दि 19 रोजी जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा व सायंकाळी पुणे येथील स्नेहा गायकवाड यांचे मी रमाई बोलतेय हे एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.दि 20 रोजी विठ्ठल कांगणे यांचे स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन होणार आहे.दि 21 रोजी लातूर येथील माधव बावगे यांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दि 22 रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर,खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.दि 24 रोजी नृत्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दि 26 रोजी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.दि 28 रोजी अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार व पुस्तक प्रकाशन करण्यात येणार असून दि 29 रोजी संगीत रजनी कडूबाई खरात यांचे कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.







