Best News Portal Development Company In India

जेवळी बसवरत्न पुरस्कार -२०२६चे नामांकन जाहीर उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

जेवळी बसवरत्न पुरस्कार -२०२६चे नामांकन जाहीर
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
लोहारा तालुक्यातील मौजे जेवळी येथे मागील दोन वर्षापासुन म्हणजेच सन २०२४ पासून महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटी जेवळी यांच्या वतीने सुरुवात केलेला ” जेवळी बसवरत्न पुरस्कार – उत्सव गुण रत्नांचा सन्मान कर्तत्वाचा ” म्हणजेच बदलत्या काळास्वरूप आधुनिकतेची कास धरून, सर्व धर्मियाना सामावून व नव तरूणाना नव संजीवनी रूपी प्रोत्साहन देण्यासाठी राबविला जाणारा अभिनव उपक्रम म्हणजेच जेवळी बसवरत्न पुरस्कार होय.
मौजे जेवळी उत्तर येथील पुरातन ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रे निमित्ताने गुणवंत मान्यवरांना जेवळी बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा अभिनव उपक्रम महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने राबविला जातो व तो या ही वर्षी आयोजीत करण्यात आलेला आहे.
गाव व गावकरी यांच्या मदतीने धावलेले , सामाजीक कार्य करून समाजभान जोपासलेले व सोबतच आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने गावाचे नावलौकिक मिळविलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने सन्मानित करण्याचा गौरवशाली उपक्रम दि.२१ मंगळवार रोजी बसवमंच , बाजारपेठ जेवळी येथे रात्री ठिक ९ वाजता सन्माननीय मान्यवराच्या हस्ते
सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कारासाठी या वर्षी ६ रत्नांची निवड करून रूढी ,परंपरा सोबतच आधुनिकतेची कास जोपासून गाव पातळी वरील सर्व धर्मीय सलोखा जोपासत यात्रेची सांगता होत असल्याबद्दल जेवळी ग्रामस्थांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आपलेपणाची भावना जोपासून सामाजिक एकोपा जोपासण्याची परंपरा अखंडीत ठेवलेली आहे. विशेष म्हणजे ” मानवता हाच धर्म ” या महात्मा बसवेश्वरांच्या विचारारूपी मार्गाने वाटचाल करून सर्व जाती धर्मातील मान्यवरांची निवड करून अभिनव उपक्रम राबविल्या बद्दल यात्रा कमिटीबद्दल गावकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
जेवळी बसवरत्न पुरस्काराचे २०२६ चे मान्यवर मानकरी
१). संतोष उपासे – संशोधन विभाग.
२). सुनिल देशपांडे – आदर्श व्यक्तिमत्व.
३) मल्लिनाथ सोळसे – आदर्श शिक्षक.
४)बाबा राठोड – पोलिस दलातील अतुलनिय कामगिरी.
५)पांडू होनाजे- आदर्श शेतकरी.
६) विशाल होनाजे -आदर्श शेतकरी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india