वागदरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध ठिकाणी अभिवादन
———————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने वागदरी तालुका तुळजापूर येथे विविध ठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील भिम नगर मध्ये पंचशील बुद्ध विहार समाज मंदिराच्या प्रांगणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वादगरी च्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन सेवानिवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वाघमारे,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, सहशिक्षक तानाजी लोहार,सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब वाघमारे,पत्रकार किशोर धुमाळ,यांच्या शुभ हस्ते पूजन करून पोलीस पाटील बाबुराव बिराजदार यांच्या हस्ते निळा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाइं(आठवले) पक्षाचे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले तर अभार प्रदर्शन चंद्रकांत वाघमारे यानी केले.या प्रसंगी काही लाभार्थी ग्रामस्थाना राज्य परिवहन मंडळाचे प्रवाशी सवलतीचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले.यावेळी समस्त बौद्ध बांधव ग्रामस्थ युवा कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच येथील ग्राम पंचायत कार्यालय वागदरी येथे ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले प्रारंभिक विद्यमान सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर उपसरपंच अंकुल वाघमारे,ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार, मुक्ताबाई बिराजदार,सुरेखाताई यादव, मीनाक्षी बिराजदार सीआरपी विद्या बिराजदार, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, रोजगार सेवक रामसिंग परिहार,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार,सामाजिक कार्यकर्ते एस.के.गायकवाड,I किशोर धुमाळ, महादेव वाघमारे,ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार चव्हाण सर्जेराव चव्हाण सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.







